गणिताचे समाजातील स्थान आणि कार्य (उत्तरार्ध)
गणिताचे महत्त्व किती याची जाणीव व्यापक समाजाला आहे का? गणित विषयात काम करणाऱ्याला समाज कशा प्रकारची वागणूक देतो? एकूण सर्वच विज्ञानक्षेत्र आणि खास करून गणित यांची चांगली कदर पाश्चात्त्य समाजाला निदान आधुनिक काळात तरी, असल्याचे दिसते. 19 व्या शतकाची सुरुवात होईपर्यंत केवळ गणितालाच वाहून घेतलेल्यांची संख्या फारच तुरळक होती. त्यानंतर मात्र गणितज्ज्ञांना, अगदी गणितासाठी गणित …